
थायराॅईड म्हणजे काय? त्यातही हायपाेथायराॅईड म्हणजे काय? या अाजाराची लक्षणे काेणती, हाेमिअाेपॅथीच्या उपचाराने हा अाजार बरा हाेताे का?
थायराॅईड म्हणजे काय? त्यातही हायपाेथायराॅईड म्हणजे काय? या अाजाराची लक्षणे काेणती, हाेमिअाेपॅथीच्या उपचाराने हा अाजार बरा हाेताे का? असे अनेक प्रश्न हा अाजार असलेल्या रुग्णांना पडतात. त्यांच्या याचा प्रश्नांची उत्तरे देण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न…
अाज अापण थायराॅइड ग्रंथीच्या अाजारातील हायपाेथायराॅइड या जास्त प्रमाणात हाेणाऱ्या अाजाराविषयी हाेमिअाेपॅथीचा विचार बघणार अाहाेत. माझा भर अाजाराची वैद्यकीय सखाेल माहिती देण्यावर नसून सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत समजावण्यावर असणार अाहे. हायपाेथायराॅइड या अाजारत प्रामुख्याने अढळणारी लक्षणे म्हणजे वजन वाढणे, शरीरावर सूज येणे, थकवा-जडपणा, बद्धकाेष्ठता, अाळस, मासिक पाळीच्या तक्रारी इत्यादी असतात. स्त्रीयांमध्ये या अाजाराचे प्रमाण जास्त अाहे. या अाजारात थायराॅइड ग्रंथीचे कार्य बिघडते व त्यामुळे हार्माेन्सचे संतुलन राहत नाही. ग्रंथी व्यवस्थित काम न करणे हे अाजाराचे कारण असले तरी हाेमिअाेपॅथी हे शास्त्र ग्रंथीचे कार्य बिघडणे हा परिणाम मानते. ग्रंथीचे कार्य बिघडण्याची कारणे ही व्यक्ती, त्यांची प्रकृती व शरीरातील प्रवृत्तीनुसार वेगवेगळी असतात.
थायराॅइडच्या ग्रंथीमध्ये बिघाड का निर्माण हाेताे? हार्माेन्सचे संतुलन का बिघडते? अचानक मागील १५-२० वर्षांपासून थायराॅइडच्या अाजारात का वाढ झाली? गेल्या १५-२० वर्षांपासून माेबाईल फाेन व टाॅवरमुळे निर्माण झालेले विद्युत चुंबकीय प्रदूषण. राेजच्या खाण्यातील व वापरातील वस्तूंमध्ये वापरण्यात येणारी व शरीरास विसंगत असणारी रसायने, शेतीमाल पिकवताना वापरण्यात येणारी रासायनिक खते व किटकनाशकांचा अनियंत्रित वापर व त्यामुळे शेतजमिनीतून नष्ट हाेणारी खनिजे जी शरीरास अावश्यक असतात. (उदा. सेलेनिअम, झिंक अायर्न इत्यादी जी थायराॅइड ग्रंथींच्या कार्यात मदत करतात.)
थायराॅइडच्या ग्रंथीमध्ये बिघाड का निर्माण हाेताे? हार्माेन्सचे संतुलन का बिघडते? अचानक मागील १५-२० वर्षांपासून थायराॅइडच्या अाजारात का वाढ झाली? गेल्या १५-२० वर्षांपासून माेबाईल फाेन व टाॅवरमुळे निर्माण झालेले विद्युत चुंबकीय प्रदूषण. राेजच्या खाण्यातील व वापरातील वस्तूंमध्ये वापरण्यात येणारी व शरीरास विसंगत असणारी रसायने, शेतीमाल पिकवताना वापरण्यात येणारी रासायनिक खते व किटकनाशकांचा अनियंत्रित वापर व त्यामुळे शेतजमिनीतून नष्ट हाेणारी खनिजे जी शरीरास अावश्यक असतात. (उदा. सेलेनिअम, झिंक अायर्न इत्यादी जी थायराॅइड ग्रंथींच्या कार्यात मदत करतात.)
यासारखी अनेक कारणे थायराॅइडसारख्या
अंत:स्त्रावी ग्रंथीमध्ये बिघाड निर्माण करतात. ही संभाव्य कारणे शरीरावर परिणाम (बायाेलाॅजिकल इफेक्ट) करतात. पण, ते अाजार निर्माण करण्याइपत घातक नसतात असे मानणारा एक मतप्रवाह वैद्यकीय शास्त्रज्ञांमध्ये अाहे. पण, बरीचशी रसायने ही विषारी असतात व त्यांचे शरीरावर घातक परिणाम हाेतात हे सत्य नाकारता येणार नाही. त्यामुळे असे म्हणतात की, विषाची परीक्षा न घेतलेलीच बरी.
उपचार – हायपाेथायराॅइड च्या उपचारामध्ये कमतरता असलेले हार्माेन्स (सिंथेटीक) गाेळ्याच्या रुपात बाहेरुन दिले जाते ते रक्तातील थायराॅइड हार्माेन्सची पातळी संतुलीत ठेवण्यास मदत करते. परंतु थायराॅइड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालाव व बाहेरुन हार्माेनच्या गाेळ्या घेण्याची गरज भासू नये ही परिस्थिती निर्माण करण्यास ते कमी पडते. हाेमिअाेपॅथीची अाैषधे सुरु केल्यानंतर थायराॅइड ग्रंथीच्या कार्यात हळुहळु संतुलन निर्माण हाेऊन बाहेरुन हार्माेनच्या गाेळ्या घेण्याची गरज कमी हाेऊ लागते व कालांतराने हार्माेन्सच्या गाेळ्या पूर्णपणे बंद हाेतात. रक्ताची तपासणी करुन थायराॅइड हार्माेन्सच्या पातळीचे निरीक्षण हाेमिअाेपॅथीक तज्ज्ञ करतात व त्यानुसार अाैषधयाेजना केली जाते. अनेकांना हाेमिअाेपॅथिक उपचाराने हायपाेथयराॅइडचा अाजार पूर्णपणे बरा हाेताे ही माहिती नसते व त्यांचा असा समज (गैरसमज) असताे की, हार्माेन्सच्या गाेळ्या कायमच घ्याव्या लागतील. पण, याेग्य हाेमिअाेपॅथीच्या उपचाराने हार्माेन्सच्या गाेळ्या तर बंद हाेतातच परंतु त्याचे दुष्परीणाम सुद्धा कायमचे टळतात.
अाॅटाे-इम्यून – प्रतिकार शक्तिशी निगडीत थायराॅइडच्या विकारात हाेमिअाेपॅथिक उपचाराने प्रतिकार शक्ती शरीरास मदत करते व अाजार पूर्णपणे बरा हाेताे
{हार्माेन्सच्या गाेळ्या घेतल्याने कमतरता भरुन निघते पण, ग्रंथीचे कार्य पूर्वेवत हाेत नाही. ग्रंथीचे कार्य पूर्ववत हाेण्यावर हाेमिअाेपॅथिक उपचारांचा भर.
{व्यक्ती, प्रकृती व शारीरिक प्रवृत्तींचा सखाेल अभ्यास करुन हाेतात हाेमिअाेपॅथीक उपचार.
स्त्रोत: https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-hypothyroidism-and-homeopathy