थायराॅईड म्हणजे काय? त्यातही हायपाेथायराॅईड म्हणजे काय? या अाजाराची लक्षणे काेणती, हाेमिअाेपॅथीच्या उपचाराने हा अाजार बरा हाेताे का?
थायराॅईड म्हणजे काय? त्यातही हायपाेथायराॅईड म्हणजे काय? या अाजाराची लक्षणे काेणती, हाेमिअाेपॅथीच्या उपचाराने हा अाजार बरा हाेताे का? असे अनेक प्रश्न हा अाजार असलेल्या रुग्णांना पडतात. त्यांच्या याचा प्रश्नांची उत्तरे देण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न…
थायराॅइडच्या ग्रंथीमध्ये बिघाड का निर्माण हाेताे? हार्माेन्सचे संतुलन का बिघडते? अचानक मागील १५-२० वर्षांपासून थायराॅइडच्या अाजारात का वाढ झाली? गेल्या १५-२० वर्षांपासून माेबाईल फाेन व टाॅवरमुळे निर्माण झालेले विद्युत चुंबकीय प्रदूषण. राेजच्या खाण्यातील व वापरातील वस्तूंमध्ये वापरण्यात येणारी व शरीरास विसंगत असणारी रसायने, शेतीमाल पिकवताना वापरण्यात येणारी रासायनिक खते व किटकनाशकांचा अनियंत्रित वापर व त्यामुळे शेतजमिनीतून नष्ट हाेणारी खनिजे जी शरीरास अावश्यक असतात. (उदा. सेलेनिअम, झिंक अायर्न इत्यादी जी थायराॅइड ग्रंथींच्या कार्यात मदत करतात.)